मेरी कॉम, सरिता देवीची माघार

combo2
जयपूर – मेरी कॉम आणि एल. सरिता देवी यांनी उद्यापासून तब्बल अडीच वर्षानंतर सुरू होणा-या वरिष्ठांच्या राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतून माघार घेतली असून पुढील महिन्यात विश्व मुष्टियुद्ध स्पर्धा असल्याने भारताच्या या दोन्ही महिला मुष्टियोद्धय़ानी राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मेरी कॉमने भारताला दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. हाताला झालेल्या किरकोळ दुखापतीमुळे तिने काही दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर सरिता देवीने काही दिवस आपल्या कुटुंबियांसमवेत घालवणार असल्याने या दोन अव्वल स्पर्धकांची उणीव राष्ट्रीय स्पर्धेत जाणवेल. रायपूरमध्ये होणा-या वरिष्ठांच्या राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी मणिपूर हौशी मुष्टियुद्ध संघटनेतर्फे सरिता देवी आणि मेरी कॉम यांचे प्रवेश अर्ज यापूर्वीच पाठविले होते. पण त्यानंतर मेरी कॉम आणि सरिता देवी यांनी आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे कळविले आहे. विश्व महिलांची मुष्टियुद्ध स्पर्धा दक्षिण कोरियात होणार असल्याने आपल्याला काही दिवस विश्रांतीची जरुरी असल्याचे सरितादेवीने सांगितले.

Leave a Comment