मतदानावर ग्रारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा बहिष्कार!

voting
नांदेड – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत ग्रारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने केवळ मदतीचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र काहीही केलेले नाही. त्यामुळे त्याचा तीव्र राग व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. याबाबतचे निवेदन हदगावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.मराठवाड्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात गारपिट व अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे सामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने हरभरा पिकाचे नुकसान झाले. प्रशासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले होते. मात्र, सात महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेले अनुदान मिळालेले नाही. प्रशासनाचा निषेध म्हणून शिबदरा येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment