मंगळावर आपले नांव पाठविण्याची संधी

nasa
मंगळावर आपले नांव पोहोचावे अशी आपली मनीषा आहे काय? मग आता घाई करायला हवी कारण नासातर्फे आखल्या गेलेल्या या मोहिमेत मंगळावर नाव पाठविण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे ३१ आक्टोबर.

मिळालेल्या माहितीनुसार नासा ४ डिसेंबर रोजी अंतराळ यानाचे परिक्षण उड्डाण करणार आहे. त्यातून ही नोंदली गेलेली नावे मंगळावर जाणार आहेत. नासाच्या ओरियन मार्स व्हीजिट वेबसाईटवर त्यासाठी इच्छुकांना साईन करावे लागणार आहे. साईटवर विचारलेली कांही माहितीही द्यावी लागणार आहे. त्यानंतर नांव नोंदविणार्‍यांना डिजिटल बोर्डिंग पास जारी केला जाणार आहे. त्यावर आपले नाव ओरियन उड्डाण मोहिमेतून मंगळावर रवाना केल्याचे कळविले जाणार आहे.

ही नांवे एका मायक्रोचीप मध्ये लोड करून मंगळावर रवाना केली जाणार आहेत. या मोहिमेचे प्रोग्रॅम मॅनेजर मार्क गेअर म्हणाले की भविष्यात मानवाला मंगळावर पाठविणे हे आमचे ध्येय असून त्यासाठी कठोर परीश्रम केले जात आहेत. सध्या नांवे पाठवून भविष्यात मंगळ प्रवास कार्यक्रमाचा हिस्सा बनविणे यामुळे शक्य होणार आहे.

Leave a Comment