भाजपला १५४ जागा, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव आघाडीवर

bjp
मुंबई – येत्या १५ आक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभांसाठी होत असलेल्या मतदानात भाजप सहयोगी पक्षांसह १५४ जागा मिळवेल असे द वीक आणि हंसा रिसर्च यांच्यातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. भाजप युतीला जास्त जागा मिळणार असल्या तरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनाच सर्वाधिक पसंती दिली गेली आहे. या यादीत पृथ्वीराज चव्हाण दोन नंबर वर आहेत. त्या खालोखाल राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस व नंतर शरद पवार यांचा नंबर आहे.

या सर्वेक्षणानुसार भाजप व मित्रपक्षांना १५४ जागा मिळतील व त्यांच्या मतांची टक्केवारी असेल ३६.५०. काँग्रेस ११.९७ टकके मतांसह २५ जागा मिळवेल. शिवसेना १७.१० टक्के मतांसह ४७ जागांवर विजयी होईल. मनसेला ११, अपक्षांना २०, अन्य पक्षांना १५ जागा मिळतील. सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसण्याचे संकेत असून त्यांना ५.८५ टक्के मतांसह केवळ १७ जागांवर विजय मिळू शकेल.

युती आणि आघाही तुटल्यामुळे यंदा महाराष्ट्रात पंचरंगी लढती होत आहेत. भाजपसोबत जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढत आहेत.

Leave a Comment