पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना राज्यपालांच्या सूचना

combo3
मुंबई – राज्यपाल सी.एच.विद्यासागर राव यांची भेट घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी निवडणूक विषय कामकाजाची माहिती दिली. राज्यात निपक्ष आणि भयमुक्त वातावरणात १५ तारखेला मतदान व्हावे यासाठी आवश्यक सूचना राज्यपालांनी त्यांना दिल्या. संजीव दयाळ यांनी राज्यपालांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीची माहिती दिली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती उपस्थित होते. राज्यपालांनी राज्यातील मतदारांना अफवांवर विश्वास न ठेवता भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीच्या पवित्र कर्तव्यासाठी सगळ्यांनी जागरूक व्हावे असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment