जेम्सबॉण्ड च्या स्टनिंग कार्सची ही पहा यादी

bond
जेम्स बॉण्ड म्हटले की एकापेक्षा एक टंच सुंदरींचा ताफा, अतर्क्य अॅक्शन्स, कल्पनेपलिकडच्या कार्स आणि हायटेक गॅजेटस् नजरेसमोर तरळतात. आज अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर राज्य करत असलेल्या या बॉण्डने आजवर वापरलेल्या कार्सची ही माहिती खास तुमच्यासाठी.

बॉण्ड चित्रपटांची सुरवात झाली १९६२ सालात. ऑटो वेबसाईट एडमण्डस डॉट कॉमवर बॉण्डसाठी वापरल्या गेलेल्या कार्सची लिस्ट प्रकाशित करण्यात आली आहे.

बॉण्ड चित्रपटात सर्वात प्रथम दिसली तरी ऑस्टीन मार्टीन डीबी ५ कार गोल्डफिंगर, थंडरबोल्ट अशा अनेक चित्रपटांसाठी वापरली गेली. ही कार इतकी लोकप्रिय ठरली की ती बॉण्ड कार नावानेच ओळखली जाऊ लागली. या कारचे उत्पादन ऑस्टीनने १९६२ ते ६५ या काळात केले. दुसर्‍या क्रमांकावर आहे लोटस एस्पिरिट एस १. ही कार प्रेक्षक विसरणेच अशक्य. कारण पाण्यात बुडल्यावर ती चक्क सबमरीन मध्ये रूपांतरीत होत असे. १९७६ साली ही कार कंपनीने खास उत्पादित केली आणि २०१३ साली लिलावात विकली गेली. बॉण्ड प्रेमीने ती साडेसात लाख डॉलर्सला विकत घेतली.
james

त्यानंतर तीन नंबरवर आली ऑस्टीन मार्टिनची व्ही ८ विंटेज. टिमोथी डाल्टन या कलाकाराची बॉण्ड च्या मूमिकेसाठी निवड झाली त्याने ती प्रथम वापरली. १९७७ ची ही ब्रिटनची पहिली सुपरकार ठरली कारण तिचा वेग होता तासाला २७० किमी. त्यानंतर आली बीएमडब्लयूची ७५० आयएल. या कारची वैशिष्ठ्ये होती मिसाईल फायरिंगची क्षमता, रिमोट कंट्रोलने कार चालविता येणे तसेच बुलेटप्रूफ कार अशी. त्यानंतर ही हे मॉडेल खास व्यक्तींनी सुरक्षेच्या कारणास्तव वापरात ठेवले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही याच मॉडेलचे नवीन व्हर्जन वापरतात.

त्यानंतर आली मक्र्युरी कोगर एक्सआर ७. फोर्डची उपकंपनी असलेल्या मक्र्युरीने ही कार तयार केली आणि बॉण्ड चित्रपटात जे थरारक कार रेसिंग किंवा पाठलाग दाखविले जातात त्यात ती वापरली गेली. त्यानंतर आलेली लोटस एस्प्रिट टर्बो केवळ दोनवेळाच चित्रपटात दिसली.एकदा ती शत्रू गाडीत शिरत असताना स्फोट होऊन उडली गेल्याचे दाखविले गेले होते. ही कारही लिलावात विकली गेली.

त्यानंतर आलेली टोयोटा २००० जीटी रोडस्टार बॉण्ड गर्ल अकीकोने वापरल्याचे दाखविले गेले ही लिमिटेड प्रॉडक्शन कार होती. त्यानंतर फोर्ड मस्टंग मॅक १ त्यानंतर बीएमडब्ल्यू झेड ८ आली. ही कारही मिसाईल डागू शकणारी, रिमोटवर चालणारी आणि इन्फ्रा रेड ट्रॅकींग सिस्टीम असलेली होती. त्यानंतर २००७ मध्ये आली ऑस्टीन मार्टिन डीबीएस हायस्पीड कार. त्यानंतरची ऑस्टीनचीच व्हँक्वीश अनेक गॅजेटसी परिपूर्ण कार बॉण्डसाठी आणली गेली. या कारचे उत्पादन आजही सुरू आहे.

Leave a Comment