गाझी आणि प्रास्पर यांच्यावर आयसीसीची बंदी

combo1
दुबई – बांगलादेशचा सोहाग गाझी आणि झिंम्बाब्वेचा प्रास्पर उत्सेया या दोन गोलंदाजांवर ‘अवैध’ गोलंदाजी शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबनाची कारवाई केली आहे. आयसीसीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या पत्रकात सांगण्यात आले आहे की, एका स्वतंत्र चाचणीद्वारे गाझी आणि उत्सेया यांची गोलंदाजीची शैली अवैध असल्याचे समोर आले असल्याच्या वृत्ताला आयसीसी पुष्टी देत आहे. तसेच या दोन्ही फिरकी गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात येत आहे. या दोन्ही गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास केला असता या दोघांचाही हात नियमानुसार १५ अंशांच्या मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे देखील या पत्रकात सांगण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात वेस्टइंडिज विरुद्ध खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर गाझीच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तर याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुलावायो येथे झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान उत्सेयाची तक्रार करण्यात आली होती. या दोन्ही गोलंदाजांना त्यांच्या शैलीत सुधारणा केल्यानंतर पुन्हा एकदा आयसीसीच्या तपासणी चाचणीला सामोरे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment