१२ लाख रुपयांचा आहे जगातील सर्वात महागडा बर्गर !

burger
लंडन – हॉंकी टॉंक या चेल्सीमधील एका उपहारगृहात जगातील सर्वात महाग बर्गरची निर्मिती करण्यात आली आहे. या बर्गरची किंमत १,१२३७.५० पौंड्स म्हणजेच जवळपास १.२ लाख रुपये एवढी आहे. या बर्गरच्या निर्मितीसाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला आहे. या बर्गरमधील पॅटीस हा २२० ग्रॅम कोब वॅग्यू बीफच्या सहाय्याने बनविण्यात आला आहे. हा बर्गर तयार करणारे शेफ ख्रिस लार्ज यांनी या बर्गरमध्ये विविध पाकांमध्ये शिजवण्यात आलेले डुकराचे मांस, बेलुगा माशाची खारवलेली अंडी आणि बदकाची स्मोक्ड अंडी वापरली आहेत. तसेच खाद्यजन्य सुवर्णपत्राने या बर्गरला आच्छादित करण्यात आले आहे. तर बर्गरमध्ये वापरण्यात आलेल्या ब्रेडला जॅपनीस चहा पावडर, क्रिम मायोनीज यांनी सजवण्यात आले आहे. तर खाद्यजन्य सुवर्णपत्राने त्याला आच्छादित करण्यात आले आहे. या बर्गरने सर्वाधिक महाग बर्गर म्हणून विक्रम नोंदवला आहे. या बर्गरमध्ये सुमारे १४ पदार्थ वापरण्यात आले असून, प्रत्येक पदार्थाचा खर्च हा ७८.५० पौंड्स आहे.

विशेष म्हणजे, या उपहारगृहाने एक खुली स्पर्धा ठेवली असून, विजेत्याला हा बर्गर मोफत मिळणार आहे. उपहारगृहाची पाच दशलक्ष किंमतीची फूड आणि ड्रिंक कुपन्सची विक्री करण्यासाठी त्यांनी या बर्गरची निर्मिती केली आहे. जो कोणी हे अवाढव्य आव्हान स्वीकारण्यास तयार असेल, तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो आणि बर्गरची चव मोफत चाखु शकतो, असे उपहारगृहाने म्हटले आहे.

Leave a Comment