मोगादिशुत सुरु झाले पहिले एटीएम

somaliya
सोमालियाची राजधानी मोगादिशु येथे देशातील पहिले एटीएम लावले गेले असून त्याबाबत येथील नागरिकांना मोठीच उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. सलाम सोमाली बँकेतर्फे एका महागड्या हॉटेलात हे एटीएस बसविले गेले आहे मात्र त्यातून सध्या फक्त अमेरिकन डॉलर्सच मिळू शकणार आहेत.

सोमालियात गेली दोन दशकांहून अधिक काळ वाशिक दंगली होत आहेत. त्यामुळे देशातील परिस्थिती अस्थिर आहे आणि देशाचा विकास ठप्प झाला आहे. बँकींग क्षेत्रही अविकसित आहे आणि येथील बहुसंख्य जनता परदेशातून येत असलेल्या पैशांवरच अवलंबून आहे. सोमालियाचे चलन शिलींग असून त्याला सध्या कोणतेही महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे देशातील व्यापारी डॉलर्समध्येच व्यवहार करतात असे समजते.

सलाम बँक लवकरच आणखीही कांही ठिकाणी एटीएम बसविणार आहे. बॅकेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एटीएम मधून फक्त डॉलर्स मिळणार असले तरी भविष्यात सर्व प्रकारची चलने एटीएम मधून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Leave a Comment