मंगळयानाने पाठवले मंगळावरील ज्वालामुखी प्रांताचे छायाचित्र

volcano
नवी दिल्ली – इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्पेस रिसर्च एण्ड ऑर्गनायझेशनच्या (इस्त्रो) मंगळयानाने मंगळ ग्रहाचे दुसरे छाय़ाचित्र पाठवले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागापासून जवळपास ६६.५४३ किमी अंतरावरुन हे छायाचित्र काढण्यात आले आहे. इस्त्रोने आपल्या फेसबूक पेजवर हे छायाचित्र प्रकाशित करताना त्याबाबत माहिती दिली. इस्त्रोने म्हटले आहे की, दक्षिणेकडील अंधा-या वातावरणात तयार होत असलेला ढग हा इलिसियम आहे. मंगळग्रहावरील हा दुस-या क्रमांकावरील मोठा ज्वालामुखी प्रांत आहे. मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केल्यानंतर मंगळयानाने ज्वालामुखीची छायाचित्रे पाठविले होती. त्यानंतर इस्त्रोने मार्स कलर कॅमे-याच्या मदतीने उत्तरी गोलार्धात असलेल्या धुलीवादळाची छायाचित्रे पाठवली होती. ती छायाचित्रे मंगळयानाने मंगळाच्या पृष्ठभागापासून ७४,५०० किमी उंचीवरुन काढली होती. भारताने २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या मंगळयानाचा प्रवेश केला.

Leave a Comment