डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता !

diesel
नवी दिल्ली – दिवाळी सणाच्या निमित्ताने वाहन चालकांना ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत. सरकार डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणूका आणि दिवाळी सणा निमित्ताने सरकार डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता आहे. असे असले तरी तूर्तास सरकारचे डिझेलवरील नियंत्रण कायम राहणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणूकीनंतर सरकार डिझेलचे दर कमी करणार आहे. परंतू कंपन्या डिझेलवर होणा-या फायद्याचा पूर्ण हिस्सा ग्राहकांपर्यंत पोहोचू देणार नाहीत. तेल वितरक कंपन्यांकडून डिझेलवर १.९० रूपये प्रति लीटरनफा होत आहे.

Leave a Comment