छत्तीसगडमध्ये चीनी कंपनीची १०० कोटींची गुंतवणूक

chatis
रायपूर – छत्तीसगढ सरकारच्या इन्फोटेक बायोटेक प्रमोशन सोसायटी व चीनी कंपनी मेसर्स फोरस्टारमध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार ही कंपनी उरकुरा औद्योगिक वसाहतीत १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. चीनी कंपनी ही गुंतवणूक संगणक उपकरणे, स्मार्टफोन, लॅपटॉप उत्पादनासाठी करणार असून राज्यातील इन्फोटेक क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक असेल असे समजते.

फोरस्टार कंपनीमुळे दरवर्षी २०० लोकांना रोजगार मिळणार आहे व पाच वर्षात १००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय सॉफ्टवेअर, विक्री, विपणन क्षेत्रातही १००० लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. कंपनीतर्फे छत्तीसगढ मधील युवकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सध्याच्या योजनेनुसार या कंपनीत संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेटची ७५ हजार युनिट बनविली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही संख्या १ लाख युनिटवर नेली जाणार आहे.

Leave a Comment