ऑनलाईन मर्डर आता हाकेच्या अंतरावर

murder
ऑनलाईनवर खून करण्याची कल्पना कशी वाटते? कल्पना चांगली वाटली तरी प्रत्यक्षात हे शक्य होईल काय असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर होय असे आहे. इतकेच नव्हे तर इंटरनेट क्षेत्रातील जागतिक तज्ञांनी या वर्षअखेर पर्यंत जगातला पहिला ऑनलाईन मर्डर झालेला असेल अशी खात्रीच व्यक्त केली आहे. आणि युरोपिय पोलिस यूरोपोलनेही त्याला दुजोरा दिला आहे.

तज्ञ आणि पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे इंटरेनट संबंधित उपकरणे हॅक करून असा मर्डर केला जाऊ शकतो. खुनाचा हा नवीन आणि आधुनिक प्रकार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण कोणत्याही देशात बसून कोणत्याही देशातील नागरिकाचा खून डोळ्याची पापणी लवायच्या आत करता येणार आहे. त्यासाठी शस्त्र म्हणून ज्याचा खून करायचा आहे त्याचा स्मार्टफोन, टॅब्लेट, संगणक, स्मार्टर्वाच, होम अप्लायन्सेस, स्मार्ट टिव्ही, हार्ट पेसमेकर अशा इंटरनेटची कनेक्ट होणार्‍या कोणत्याही उपकरणाचा वापर करता येणार आहे. ही उपकरणे हॅक करणे इतकेच खुन्याला करायचे आहे.

जगात येत्या कांही वर्षात अब्जावधींच्या संख्येने इंटरनेटला जोडलेली डिव्हायसेस उपलब्ध होणार आहेत आणि आपले हे इंटरनेट वेड आपल्या मुळावर येऊ शकणार आहे. जितकी इंटरनेट आधारिक उपकरणे जास्त तितकी ती हॅक होण्याचे प्रमाणही वाढणार असल्याने गुन्हेगारांचे मनसुबे आपोआपच पुरे होऊ शकतील असाही इशारा दिला गेला आहे. शिवाय या गुन्ह्यांचा तपास करणे अवघड असल्याने मानव जातीला मोठाच धोका निर्माण होऊ घातला आहे असेही या तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment