इंटरनेटवर सेहवागला सर्वात जास्त पसंती !

sehwag
नवी दिल्ली – क्रिकेट संघात पुनरागमनाची वाट पहाणा-या खेळाडूंमध्ये भारतीय धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागला इंटरनेटरवर सर्वात जास्त शोधण्यात आले आहे. गूगलने याची घोषणा केली आहे. गूगलने मागील महिन्यातील आकडे जारी करताना सांगितले की, संघातून बाहेर असलेल्या खेळाडूंमध्ये सेहवाग आणि गौतम गंभीरला इंटरनेवर लोकांनी सर्वात जास्त प्रमाणात शोधले आहे. राष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सेहवाग आणि गंभीर यांच्याव्यतिरिक्त सुरेश रैना या यादीत तिस-या स्थानावर आहे. गूगलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे क्रीडा विशेषज्ञ सेहवागच्या राष्ट्रीय संघातील पुनरागमनाबाबत शंका उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे सेहवागचे चाहते सलग त्याला इंटरनेटवर शोधत आहेत आणि त्याला स्वत:चे समर्थन देत आहेत. इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) आणि चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत कोलकाता नाइट राइडर्सच्या विजेत्या संघाचा कर्णधार गौतम गंभीर देखील राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी संघर्ष करत आहे. असे असूनही गंभीर पुढीलवर्षी होणा-या आयसीसी विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करणा-यांमध्ये प्रबळ दावेदार मानला जात आहे आणि चाहते देखील इंटरनेटवर त्याच्यासोबत आहेत.

Leave a Comment