आहार आणि पोषणद्रव्य सल्लागार

food
अलीकडच्या काळामध्ये बदलत्या जीवन पद्धतीनुसार वेगाने विकसित झालेला एक चांगला स्वयंरोजगार म्हणजे आहार आणि पोषणद्रव्य सल्लागार. सध्या भारतामध्ये हृदय रोग आणि रक्तदाबाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. बदलत्या जीवन शैलीने अनेक रोगांना बढावा द्यायला सुरुवात केली आहे. एका बाजूला वैद्यकीय प्रगती होत असताना आणि काही रोगांचे प्रमाण कमी होत असताना काही विशिष्ट आजारांचे प्रमाण मात्र वाढत चालले आहे. या वाढत चाललेल्या आजारांमध्ये बहुतेक आजार हे जीवन शैलीशी निगडित आहेत. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली स्पर्धा, ती जिंकण्यासाठी आपण करत असलेली धावपळ आणि त्यामुळे आपल्या दिनचर्येत झालेले बदल आणि अनियमितता यातून हे विकार उद्भवलेले आहेत. आपल्या जीवनात झालेल्या बदलामध्ये जेवणाच्या वेळा आणि पद्धती यांचा मुख्यत्वे समावेश आहे. आहार आणि विहार या दोन गोष्टीत झालेल्या बदलांमुळे हे सारे मनोकायिक विकार बळावत चालले आहेत. त्यामुळे अनेक लोक खाण्याच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. काय खावे, किती खावे आणि कधी खावे याचे मार्गदर्शन घेऊनच वावरणारे लोक आता वाढत चालले आहेत. त्यातूनच आहारतज्ज्ञ किंवा आहार आणि पोषणद्रव्य सल्लागार हा स्वयंरोजगार विकसित झाला आहे.

लोक आपल्या प्रकृतीविषयी खूपच जागरूक व्हायला लागले आहेत आणि आपली प्रकृती आपल्या आहारावर अवलंबून आहे याची जाणीव त्यांच्यात वेगाने वाढायला लागली आहे. मात्र आपल्या आरोग्यासाठी आपण काय खाल्ले पाहिजे याची शास्त्रीय माहिती प्रत्येकालच असते असे नाही. म्हणूनच ते तज्ज्ञांचा सल्ला घेतात आणि या तज्ज्ञांचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. बरेच पुढारी, मोठ्या उद्योग समुहातील अधिकारी, एवढेच नव्हे तर चित्रपट अभिनेते, खेळाडू या सर्वांमध्ये आपला एक आहार तज्ज्ञ असला पाहिजे, अशी जाणीव वाढत आहे. आपल्या यशामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये आपल्या डाएटिशियनने दिलेला सल्ला हे एक महत्वाचे कारण असणार आहे, याची जाणीव त्यांना झालेली आहे. म्हणून डाएटिशियन हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. विविध शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांमध्ये राहणार्‍या मुलांना कोणता आहार द्यावा याचा निर्णय घेण्यासाठी खास न्यूट्रिशन क्षेत्रातील तज्ज्ञ नेमलेले असतात. त्यामुळे तोे सुद्धा एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.

काही विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करता येतो. या व्यवसायाला एक वैद्यकीय अंग सुद्धा आहे. कारण बर्‍याच आजारांमध्ये औषधे तर दिली जातातच, पण निव्वळ खाण्याची पथ्ये नीट पाळण्यानेही काही विकार आटोक्यात येतात आणि नियंत्रणात राहतात. अर्थात अशा प्रत्येक व्यक्तीला किंवा रुग्णाला स्वतंत्र डाएटिशीयन ठेवणे परवडत नाही. ते काम सल्लागाराकडून करून घेता येते. अजून लहान शहरांमध्ये डाएटिशियन हा धंदा म्हणावा तसा वाढलेला नाही. मात्र मुंबई-पुण्यासारख्या शहरामध्ये डाएटिशियनचे व्यवसाय व्यवस्थित चाललेले आहेत. स्वतंत्रपणे एखादे क्लिनिक सुरू करून हा व्यवसाय करता येतोच, परंतु कसलेही भांडवल न गुंतवता सुद्धा आपल्या घरात हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यासाठी केवळ मोबाईल फोनचा वापर करावा. ज्या पेशंटला सल्ला हवा असेल त्याला तो मोबाईल फोनवरून देता येईल किंवा फार सविस्तर चर्चा करायची असेल तर हा कन्सल्टंट त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करू शकतो. असाही व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत. व्यवसायाची सुरुवात अशी साधी करून, त्यातून पैसे कमावून ते साठवून पुढे मोठा व्यवसाय करता येतो. सुरुवात मात्र बिनभांडवलीत होऊ शकते

न्यूट्रिशनचे स्वतंत्र अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांमध्ये आहेतच. पण काही विज्ञान विषयक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षांना या विषयात स्पेशलायझेशन करण्याची सोय करण्यात आलेली आहे. एस.एन. डी.टी. विद्यापीठातील गृहशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर पदव्युत्तर पदवी घेताना असे स्पेशलायझेन करता येते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या अनेक मुली या व्यवसायात स्थिरावलेल्या आहेत. त्याशिवाय सरकारने सुद्धा अशा पदवीधरांसाठी काही नोकर्‍या निर्माण केलेल्या आहेत. हा विषय ङ्गार व्यापक आहे. कारण तो प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. आपल्या समाजातल्या प्रत्येकालाच खायला लागते आणि आपल्या खाण्याचा आपल्या जीवनावर काही विशिष्ट परिणाम असतो याची जाणीव सर्वांनाच असते. खालील संस्था या विषयाचे शिक्षण देतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑङ्ग न्यूट्रिशन हैदराबाद, www.nininindia.org युनिव्हर्सिटी ऑङ्ग मद्रास, चेन्नई, www.unom.ac.in तामिळनाडू डॉक्टर एम.जी.आर. मेडिकल युनिव्हर्सिटी, चेन्नई © scripts. tnmgrmu.ac.in युनिव्हर्सिटी ऑङ्ग ऍग्रीकल्चरल सायन्सेस बंगलोर, www.uasbangalore.edu.in सेंट्रल ङ्गूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर www.cftri.com अविनाशी लिंगम इन्स्टिट्यूट ऑङ्ग होम सायन्स ऍन्ड हायर एज्युकेशन ङ्गॉर विमेन, मेटुपलायम रोड, कोईमतूर www.avinuty.ac.in इच्छुकांनी वरील संकेत स्थळावर संपर्क साधावा.

Leave a Comment