सेना-मनसे युतीला निवडणुकीनंतर मुहूर्त – संजय राऊत

sanjay-raut
मुंबई – शिवसनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताचीच असल्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूकीनंतर निर्णय घेतील अशी माहिती दिली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपाने युती तोडल्यानंतर फोन करून एकत्र येण्याविषयी विचारले होते. याविषयी दोन्ही बाजूने चर्चा करण्याचे ठरले होते. मात्र, मनसेकडून प्रयत्न होऊनही शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीवरील वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात राज आणि उद्धव एकत्र येतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Leave a Comment