लावाचे दोन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच !

lava
मुंबई – लावा मोबाईल कंपनीने दोन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात `लावा आयरिस ३४९ आय’ आणि `लावा आयरिस ४०४ इ’ हे दोन स्मार्टफोन आहेत.

`लावा आयरिस ४०४ इ’ची वैशिष्ट्ये पाहिल्यास ड्यूल-सिम सपोर्ट, ४८०x८०० पिक्सल रिझोल्युशन ४ इंच डिस्प्ले, अँड्रॉईड ४.२ जेली बीन, १.२ गीगाहर्त्झ ड्यूल-कोअर प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅम, २ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश कॅमेरा, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, २ जीबी इंटरनल स्टोरेज ३२ जीबी पर्यंत मायक्रो-एसडी कार्ड, १४००mAh बॅटरी क्षमता, जीपीआरएस, एज, वाय-फाय, ब्ल्यूटूथ ३.० अशी आहेत. तर `लावा आयरिस ४०४ इ’ स्मार्टफोनची किंमत ४,४९९ रुपये आहे. तसेच तसेच `लावा आयरिस ३४९ आय’ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहिल्यास ड्यूल-सिम सपोर्ट, ३२०x३२० पिक्सल रिझोल्युशन ३.५ इंच डिस्प्ले, अँड्रॉईड २.३.६ जिंजरब्रेड, १.० गीगाहर्त्झ ड्यूल-कोअर प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅम, २ मेगापिक्सल कॅमेरा, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ५१२ एमबी इंटरनल स्टोरेज ३२ जीबी मायक्रो-एसडी कार्ड क्षमता, १४००mAh बॅटरी क्षमता, जीपीआरएस, एज, वाय-फाय, ब्ल्यूटूथ अशी आहेत. तर `लावा आयरिस ४०४ इ`ची किंमत फक्त २,८९९ रुपये इतकी आहे.