जंगली रेड्यांनी घेतला सिंहाचा जीव

sinha
आपल्याकडे यात्रास्थळी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन भाविकाचा मृत्यू होणे ही नित्याची बाब आहे. कदाचित आपल्या देशाप्रमाणे अन्य देशातही या घटना घडत असतील. मात्र चेंगराचेंगरीत केवळ माणसेच मरतात अशी जर आपली कल्पना असेल तर ती चुकीची ठरू शकते. शहरागावांप्रमाणेच जंगलातही पशुंच्या कळपात चेंगराचेंगरी होते आणि त्यात पशू मरतात. जंगली रेड्यांच्या कळपात अशाच प्रकारे झालेल्या चेंगराचेंगरीत चकक एका सिंहाचा बळी गेल्याची घटना द. आफ्रिकेत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार द. आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्क मध्ये कळपातून बहिष्कृत झालेला एक सिंह जखमी अवस्थेत गवतावर शांत झोपला होता. इतक्यात तेथे जंगली रेडे आणि म्हशींची झुंड आली. झुंडीला सिहाचा परिचित वास येताच हा कळप उधळला आणि वेगाने पळत सुटला. मात्र त्यांच्या खुरांखाली जखमी सिह अक्षरशः चेंगरला गेला. झुंड येताना पाहताच सिंहाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला जोरात पळता न आल्याने तो कळपाच्या ताब्यात सापडला आणि चेंगरला गेला.

या घटनेचे फोटो काढणार्‍या ग्रेग या फोटोग्राफरने दिलेल्या माहितीनुसार गेली दोन वर्षे तो या सिंहाला ओळखत होता. कांही दिवसांपूर्वीच या सिंहाची पाच कळपातील सिंहांबरोबर लढाई झाली होती व त्यात तो जखमी झाला होता. पराभव झाल्यामुळे त्याला त्याच्या कळपात स्थान राहिले नव्हते. त्यामुळे तो एकाकी होता. जंगली रेड्यांच्या हल्ल्यात अखेर त्याला मरण आले.

Leave a Comment