
मुंबई – कालच सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होऊ शकते असे वक्तव्य केले होते, त्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी माझ्या, उद्धवच्या मनोमिलनाची मिडीयाने काळजी करू नये, उद्धव आणि मी मिळून सत्तेत एकत्र बसायचा निर्णय घेऊ, अशा शब्दांत राज यांनी भाऊबंध जोडले जाण्याबाबत भाष्य केले. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरेंनी दिले एकत्र येण्याचे संकेत
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज म्हणाले, आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. महाराष्ट्र मोठा व्हायचा असेल तर कुणाचा इगो, भांडणे, कुणा एकाचा दृष्टीकोन यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. हे माझे स्वप्न असून, मला महाराष्ट्र तेथे घेऊन जायचा असेल तर कोण सोबत येईल नाही येईल याने काही फरक पडणार नसल्याचे राज यांनी सांगितले. निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना राज यांच्या या विधानाने राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.
