याहूचे भारतातील ३०० अभियंते होणार बेरोजगार

yahoo
बंगळुरू – इंटरनेट विश्वातील आघाडीची कंपनी असलेल्या याहूने बंगळुरूमधील ३०० अभियंत्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूमधून केले जाणारे काम कॉलिफोर्नियामधील मुख्यालयातून करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भारतीय अभियंत्यांवर ही बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. याहूच्या प्रवक्त्यांनी याप्रकरणी कोणतीही प्रक्रिया देण्यास नकार दर्शविला असला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरु येथील ६०० ते ६५० अभियंत्यांपैकी सुमारे ७० टक्के अभियंत्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. तर काही, अभियंत्यांना अमेरिकेत जाण्यास सांगण्यात आले आहे. कामावरून कमी करण्यात येणार्‍या अभियंत्यांना सहा महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार असून ज्या अभियंत्यांना अमेरिकेत जाण्यास सांगण्यात आले परंतु ज्यांची तिकडे जाण्याची इच्छा नव्हती अशा कर्मचार्‍यांना १२ महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. याहूच्या अधिकार्‍यांनी याबाबत बोलताना बंगळुरूमधील कार्यालय बंद करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगत हा निर्णय कंपनीची स्थिती भक्कम करण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment