भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भूतानला भारताचे सहाय्य

bhutan
भ्रष्टाचार आणि भूतान यांचा संबंध कांही काळापूर्वी अशक्य कोटीतला मानला जात होता. मात्र या देशात अलिकडेच भ्रष्टाचाराने आपली मूळे पसरविण्यास सुरवात केली असल्याचे अहवाल येत आहेत. नवलाची गोष्ट अशी की पारदर्शी व भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी असलेल्या देशांच्या यादीत ३१ नंबरवर असलेल्या भूतानने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासाठी या यादीत ९४ व्या स्थानावर असलेल्या भारताची मदत घेतली आहे.

भारत भ्रष्टाचारी देशांच्या यादीत चांगल्याच वरच्या क्रमांकावर असला तरी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भारताकडून जी उपाययोजना केली जात आहे त्यांचे चांगले निकाल मिळत आहेत. विशेषतः गावांचे सोशल ऑडिट, जनअदालत यासारखे साधे उपाय अधिक परिणामकारक ठरले आहेत. सिंचनासाठी अधिक खर्च दाखवून वरची रकम गडप करणे, शौचालयांचा निधी मंदिर देवळे बांधण्याकडे वळविणे या प्रकारचा भ्रष्टाचार भूतानमध्ये नाही.

भूतानने रस्ते बांधणी, वीज या क्षेत्रांसाठी भारताचे सहकार्य घेतले आहे. आता सरकारी कामात पारदर्शकता, सामाजिक भ्रष्टाचार नियंत्रण यासाठीही भारताचे सहकार्य घेतले जात असून मजदूर किसान शक्ती संघटना आणि सोसायटी फॉर सोशल अकौंटेबिलीटी अॅन्ड ट्रान्स्परन्सी या दोन भारतीय संघटना भूतानला या संदर्भात सहकार्य करत आहेत. त्यासाठी सहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थांनी तयार केला असल्याचे व त्यानुसार प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते.

Leave a Comment