भारत-पाकिस्तानने चर्चेने मुद्दे सोडवावेत – संयुक्त राष्ट्रसंघ

uno
संयुक्त राष्ट्रसंघ – भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेवर वारंवार होणा-या शस्त्रसंधीच्या घटनांबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने मतप्रदर्शन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी दोन्ही देशांनी आपले मुद्दे चर्चेने सोडवावे, असे आवाहन केले आहे. मून यांचे प्रवक्ता स्टीफन्स़ डुजारीक यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून दोन्ही देशांना आवाहन केले आहे. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात पाच भारतीय मारले गेल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने हे आवाहन केले आहे. दरम्यान पाकिस्तानने कथित शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत भारतासमोर विरोध प्रदर्शित केला होता. तसेच या परिस्थितीबाबत आपण ‘यूएन मिलिट्री ऑब्जर्व्हर ग्रुप इन इंडिया एण्ड पाकिस्तान’ कार्यालय़ाशीदेखील संपर्क साधला असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.