फ्लिपकार्टने मागितली वेबसाईट क्रॅश झाल्याबद्दल माफी !

flipcart
मुंबई – देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट डॉट कॉमने बंपर सेल ‘The Big Billion Day’ लाँच केली होती. मात्र लॉन्चिंग नंतर काही वेळातच फ्लिपकार्टचे संकेतस्थळ क्रॅश झाले. ज्यामुळे ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागला.याबाबत फ्लिपकार्टचे सीईओ सचिन बंसल यांनी आपल्या ग्राहकांची क्षमा मागितली आहे. तसा इ-मेल त्यांनी सर्व ग्राहकांना पाठवला आहे. त्यात त्यांनी आपली साइट क्रॅश झाल्यामुळे ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. वेबसाइटने आपल्या अनेक उत्पादनांवर भरघोस सूट दिली होती. त्यामुळे त्याची खरेदी करण्यासाठी लाखो ग्राहकांनी वेबसाइट उघडली. एकाच वेळी इतक्या ग्राहकांनी वेबसाइट उघडल्यामुळे काही तासांमध्येच साइट क्रॅश झाली आणि ग्राहकांना त्रास झाला असल्याचे माफीनाम्यात म्हटले आहे.

Leave a Comment