पीटरसनच्या गैरवर्तणूकीचा इमेल लीक

kevin
लंडन – इंग्लंड क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भितीच्या वातावरणाबद्धल सांगून आरोप करणारा माजी फलंदाज केविन पीटरसन विरूद्ध एक इमेल पसरला आहे. त्या इमेलमध्ये मागीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिकेतील त्याच्या गैरवर्तणूकीबाबत सांगण्यात आले आहे. इंग्लंड आणि क्रिकेट वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की, क्रिकेइन्फोला मिळालेला माजी प्रशिक्षक एंडी फ्लॉवर यांचा इमेल अधिकृत नाही. तर त्याच्या वकिलांमार्फत तयार करण्यात आलेला गोपनीय इमेल आहे. पीटरसनने इमेलला चुकीचे असल्याचे सांगत स्पष्ट केले की, मी त्याबाबत ऐकले. ते खूप निंदनीय आहे. तो कुकच्या नावाची स्पेलिंग देखील लिहू शकला नाही, हे हसण्यासारखेच आहे. मी त्याबाबत विचार केला. इमेलमध्ये लिहिले आहे की, पहिल्या कसोटी सामन्याच्या अखेर केपीला त्याच्या १०० व्या कसोटी सामन्याच्या आनंदात संघानी एक भेटवस्तू दिली. आपल्या भाषणात केविनने म्हटले होते की, इंग्लंड ड्रेसिंग रूमचे वातावरण इतके चांगले कधीच नव्हते. त्यात हे देखील लिहिले होते की, चौथा कसोटी सामन्यात लवकर बाद झाल्याने पीटरसनने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन युवा खेळाडूंना अपशब्द बोलू लागला.

Leave a Comment