जागतिक कबड्डी लीगचे अन्य सामने भारतात !

kabbadi
नवी दिल्ली – जागतिक कबड्डी लीगच्या आयोजकांनी कबड्डीचे सामने भारतात आणि केवळ अंतिम सामना पाकिस्तानात खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार, अंतिम सामना पाकिस्तानातील लाहौर येथे खेळविण्यात येणार आहे. प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघून नव्या आयोजन स्थळांवर विचार करण्यात आला. बठिंडा, मोहाली, जालंधर याव्यतिरिक्त भोपाळ आणि मुंबर्इत देखील हे सामने खेळविण्यात येणार आहेत. लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमन रहेजा यांनी सांगितले की, आम्हाला भारतात जबरजस्त उत्साह बघायला मिळाला आणि फ्रेंचायजी मालकांचे देखील मत आहे की, लीगचे सामने भारतातच झाले पाहिजे. कारण, त्यामुळे प्रेक्षक, चाहते आणि स्पर्धेच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होर्इल. लीगचे कमिश्नर परगट सिंह यांनी सांगितले की, आम्ही भारतात या लीगची लोकप्रियता बघितली आहे आणि त्याला लक्षात घेऊनच अन्य कबड्डीचे सामने आम्ही भारतात खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामना पाकिस्तानात होणार आहे कारण, तेथील प्रशासनाने आम्हाला समर्थन करण्याचे वचन दिले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment