‘एलईडी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर!

led
स्टॉकहोम – जागतिक तापमान वाढीच्या विरोधात लढा देणाऱ्या ब्लू लाइट इमिटिंग डायोडच्या (एलईडी) च्या शोध लावून जगाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या जपान, अमेरिका या देशातील तीन वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्राच्या संशोधकांना त्यांच्या अमुल्य कामगिरीबाबत नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अँकॅडमी ऑफ सायन्सने या पुरस्काराची घोषणा केली आहे. इसामू अकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा या संशोधकांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

एलईडीच्या निर्मितीमुळे जगभरातील दीड अब्ज नागरिकांच्या जीवनमानामध्ये बदल झाला असून, अतिशय दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत प्रकाश पोहोचला आहे. अगदी किमान सौरऊर्जेवरही हे दिवे पुरेसा प्रकाश देत असल्यामुळे वीजपुरवठ्याची यंत्रणा असण्याचीही गरज उरलेली नाही. प्रकाशासाठीच्या पूर्वीच्या दिव्यांना एलईडी च्या माध्यमातून नवा आणि कार्यक्षम पर्याय समोर आला आहे, असे रॉयल स्वीडिश अकादमीने म्हटले आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी १९९० च्या दशकामध्ये या तंत्रज्ञानाचा शोध लावला होता. अशाप्रकारे ब्लू लाइट एमिटिंग डायोड पासून तयार झालेला दिवा पांढऱ्या रंगात प्रज्वलित करण्यात अनेक शास्त्रज्ञांना अपयश आले होते. संशोधन संस्था आणि उद्योगांना तीन दशकांनंतरही यश मिळत नव्हते. मात्र, या तिन्ही शास्त्रज्ञांनी क्रांतिकारी यश मिळविले. ‘ब्लू एलईडी’च्या तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांकडून तीन दशकांकडून संशोधन करण्यात येत होते. मात्र, संशोधन संस्था आणि उद्योगांना त्यामध्ये यश येत नव्हते. लाल आणि हिरव्या रंगातील ‘एलईडी’च्या बरोबरीने निळ्या रंगाच्या ‘एलईडी’बाबत शास्त्रज्ञांना यश येत नव्हते. या तीन रंगांच्या मिश्रणाशिवाय पांढऱ्या रंगातील प्रकाश निर्माण होणे शक्य नव्हते आणि त्याशिवाय दिव्यांबरोबरच कम्प्युटर, टीव्हीमध्येही दिव्यांचा कार्यक्षम वापर शक्य नव्हता. आज बहुतांश घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ‘एलईडी’च्या दिव्यांचा वापर होता. या दिव्यांसाठी वीजही कमी प्रमाणात लागते. अगदी स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठीही ‘एलईडी’चा वापर करण्यात येतो.

Leave a Comment