‘हॉकी’ अजूनही देशात जिवंत – अल्टमस

hockey
नवी दिल्ली – १६ वर्षांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आशियार्इ खेळादरम्यान पराभूत करून भारतीय हॉकी संघाने २०१६ च्या ऑलंपिक स्पर्धेत सरळ प्रवेश केला आहे. भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक रोवलेट अल्टमस असे मानतात की, सुवर्ण पदक जिंकून हॉकी अजून जिवंत आहे आणि तिचा विकास होतो आहे, हेच देशाने सिद्ध केले आहे. ते हणाले की, मी असा दावा करत नाही. पण मला माहित आहे की, मी काय काम करत आहे. हे महत्वाचे आहे की, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही कामगिरी करून दाखविली. भारतीय हॉकीमध्ये महिला आणि पुरुष संघाच्या कामगिरीने अल्टमस खूष आहेत. ते म्हणाले की, या कामगिरीने आम्ही समाधानी असलो तरी, आम्हाला ब-याच सुधारणा करण्यासारख्या आहेत.

Leave a Comment