स्काइपवरून करण्यात येणारे देशांतर्गत कॉल नोव्हेंबरपासून बंद ?

skype
नवी दिल्ली – स्काइप या लोकप्रिय संकेतस्थळावरून देशांतर्गत लॅंडलाइन आणि मोबाइलफोनवर व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा आता लवकरच बंद करण्यात येणार आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून ही सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. ही सुविधा पुरविणार्‍या मायक्रोसॉफ्टने याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या बाहेरून या सुविधेचा वापर करून भारतातील लॅंडलाइन किंवा मोबाइल फोनवर संपर्क साधता येऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे भारतातून इतर देशांमध्ये देखील कॉल करता येणार आहे. फक्त देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली आहे. ही सुविधा बंद होण्याने ज्या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांना कंपनीकडून भरपाई दिली जाणार असल्याचे देखील यावेळी कंपनीतर्फे सांगण्यात आले. स्काइपसारख्या सुविधेमुळे इंटरनेटच्या साहाय्याने व्हिडिओ कॉंलिंग मोफत करता येते. भारत सरकारच्या नियमांनुसार, इंटरनेटवरून व्हॉइस कॉल करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतातून इंटरनेटद्वारे केले जाणारे व्हॉइस कॉल इतर देशांमधून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुपांतरित केले जातात.

Leave a Comment