सुवर्णसाठ्याच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये भारताचा समावेश

glod
नवी दिल्ली – सोन्याच्या मागणीत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश असलेल्या भारताचा सुवर्ण साठ्याच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये समावेश झाला आहे. जागतिक सुवर्ण परिषदेतर्फे (डब्ल्यूजीसी) जाहीर करण्यात आलेल्या एका ताज्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात जास्त सुवर्ण साठा असलेल्या अव्वल १० देशांच्या यादीत अमेरिका, जपान आणि रशिया सारख्या विकसित आणि शक्तिशाली देशांच्या पंक्तीत भारत देखील जाऊन बसला आहे.

या अहवालानुसार, भारताकडे एकूण ५५७.७ टन सोन्याचा साठा आहे आणि विदेशी भांडवल साठ्यातील याचे योगदान ७.१ टक्के इतका आहे. जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा अमेरिकेकडे असून देशात ८१३३.५ टन सोने आहे. विदेशी भांडवली साठ्यात अमेरिकेच्या सोन्याचे योगदान ७२.१ टक्के इतके आहे. अमेरिकेनंतर या यादीत जर्मनी (३३८४.२ टन सोने), इटली (२४५१.८ टन सोने), फ्रान्स (२४३५.४ टन सोने) आणि रशिया (१११२.५ टन सोने) या देशांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment