शिवसेना नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे – जावडेकर

javdekar
मुंबई – शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी भाजपाला अफजल खानांची फौज उद्देशल्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यास उलट उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. भाजपा नेते आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळल्यामुळे मूर्खपणाची बडबड करत आहेत. जावडेकर यांनी पुढे सांगितले की, शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूरात सूर मिसळवत आहेत. भाजप महाराष्ट्रात जिंकण्याची शक्यता असताना शिवसेनाला त्यात अफजल खान दिसत आहे. कदाचित उध्दव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळले असावे त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल अशी शक्यता असल्याने ते बेभान झाले आहे. छत्रपती शिवाजी काही केवळ शिवसेनेची मक्तेदारी नाही. भाजपने असे मुद्दे घेतल्याने शिवसेनेला आपले मतदार गमवण्याची भिती वाटत असावी म्हणून ते तोल ढळल्या प्रमाणे करत आहेत.

Leave a Comment