विकासाच्या आडून महाराष्ट्राचे तुकडे पाडणार्‍यांना मते देऊ नका : उद्धव ठाकरे

uddhav
उस्मानाबाद – विकासाच्या आडून महाराष्ट्राचे तुकडे पाडणार्‍यांना मते देऊ नका आणि त्यांच्या भूलथापांनाही बळी पडू नका असे आवाहन तुळजापुरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपावर कठोर शब्दात टिका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्र जिंकायला दिल्लीवरुन अफझल खानाची फौज आली असून त्याना महाराष्ट्राचे टुकड़े पाडायचे आहेत आणि महाराष्ट्र अशांना भीक घालणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भाजपाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही तसेच दिल्लीच्या तालावर शेपूट हलवणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा काय? कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे. विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे राज्य असण्याची गरज नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात भाजपचे सरकार नव्हते तरी गुजरातचा विकास झालाच, असे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्राचे टुकडे पाडणार्‍यांच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.