मोदींच्या कोल्हापूरी भाषणाने भाजपच्या प्रचाराला लागले चारचांद

modi
कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरवासियांची मने जिंकली आहेत. निवडणूक प्रचारासाठी कोल्हापूरात आलेल्या नरेंद्र मोदी यांनी बालपणापासून कोल्हापूरात असलेल्या आठवणींना उजाळा दिला. छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख करून त्यांनी कोल्हापूरवासियांना आपुलकीचा पहिला किस्सा सांगितला आणि छत्रपती ताराराणी, कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूरचा गुळ उद्योग आणि कोल्हापूरी चप्पल यांच्याबद्दलची आपल्या मनात असलेली भावना भाषणात व्यक्त करून कोल्हापूरकरांच्या टाळ्या मिळवल्या. गुजरातमधील लहान गावात जन्म झाला तेव्हापासून कोल्हापूरच्या चविष्ट गुळाची चव मी अनुभवली आहे, असे मोदी म्हणाले. माझ्या गावात त्यावेळी देखील कोल्हापूरचाच गूळ वापरला जात होता, असे ते म्हणाले.

तेव्हा कोल्हापूरशी माझे बालपणापासूनचे नाते आहे, असे ते म्हणाले. आम्हाला त्यावेळी गुजरातमधील शहरांची नावे माहित नव्हती तेव्हापासून कोल्हापूर माहित आहे असे सांगितले तेव्हा मोदींना टाळ्याच टाळ्या मिळाल्या. छत्रपती शाहूमहाराज यांनी सर्वजन सुखाय आणि सर्वजन हिताय असा नारा दिला आणि आम्ही त्यांचेच कार्य पुढे घेऊन जात आहोत असे देखील मोदी म्हणाले. महालक्ष्मीचा आशिर्वाद घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात आणि छत्रपती ताराराणींचा इतिहास आम्हाला नेहमीच स्फूर्ती देणारा आहे, असे ते म्हणाले. कोल्हापूरी चप्पल हा प्रत्येकासाठी आकर्षणाचा विषय आहे, असे ते म्हणाले. १९२५ पासून कोल्हापूरातील तपोवन परिसरातील चरखा आश्रम या महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्यासंस्थेसाठी कॉंग्रेसने काय केलेले तुम्ही पाहिले आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा कोल्हापूरकरांनी त्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.