भारतीय फुटबॉल संघातील महिला खेळाडू दुर्लक्षित !

football
नवी दिल्ली – भारतात १२ ऑक्टोबर रोजी इंडियन सुपर लीगची (आयएसएल) सुरुवात होत आहे. आर्थिक स्तरावर फुटबॉल खेळाडूंसाठी नव्या दिशा निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत फुटबॉल खेळाची प्रतिमा बदलेल की नाही हे लवकरच ठरेल. परंतू या सामन्यांच्या आधी राजधानी दिल्लीत सुब्रतो कप ही देशातील सर्वांत जूनी शालेय स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हिस्सा घेणा-या १७ वर्षांखालील मुलींच्या गटात फुटबॉल खेळाडूंची स्थिती फारच कमजोर आहे. तरी देखील फुटबॉल खेळाडू जिद्दीने देशाची मान उंचावत आहेत.

भारतीय फुटबॉल संघात सहभागी झालेल्या खेळाडूंचे वडिल मजूरी करतात तर काही जणांचे वडिल मिरची विक्री करून कुटुंब चालवतात. आसामच्या किंयाग कासिया मेमोरियल आदिवासी शाळेतून (हैलाकांदी) आलेली १६ वर्षांची पंचमी देवनाथने सांगितले की, मी नववीत शिकते. मी जेव्हा चौथीत होते. तेव्हा घराजवळच खेळणा-या मुलांसोबत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. घरात कमावण्याची जबाबदारी वडिलांवर आहे आणि ते मिरची विकून कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. फुटबॉल खेळ वडिलांना आवडतो. पण काही समस्यांमुळे टी-शर्ट, फुटबॉल खेळतांना घालायचे बूट आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देऊ शकत नव्हते. वडिलांनी एकदा मला सांगितले की, मी कितीही मेहनत करूनही मला काहीच मिळत नाही. त्यामुळे तू फुटबॉल खेळ, कदाचित कुटुंबाचे नशीब बदलेल. या कारणासाठीच वडिलांनी पंचमीला त्रिपुराच्या कुमारघाटी गावात राहून देखील हैलाकांदी येथील शाळेत प्रवेश मिळवून दिला. झारखंडच्या रांची येथून आलेल्या भारतीय फुटबॉल संघातील बहुतांश महिला खेळाडूंची आर्थिक स्थिती फारच खराब आहे. यामध्ये महिला खेळाडू आदिवासी आहेत. ही संस्था युवकांद्वारे चालवली जाते. संस्थेचे संस्थापक आणि प्रशिक्षक अमेरिकेचे फ्रांज गास्टलर यांनी सांगितले की, या संस्थेत सध्या १५० महिला खेळाडू आहेत. त्या फुटबॉलसोबत येथे शिक्षण देखील घेतात. या संघाने स्पेनमध्ये गेस्टिज कपमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. या युवा फुटबॉल संघासोबत मुंबईच्या डॉ. प्रतिभा गोलेचा जोडलेल्या आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी या संस्थेविषयी ऐकले तेव्हा स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि संघासोबत दिल्लीत त्या सामील झाल्या. डॉ. प्रतिभा यांनी संघासोबत काम करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे शुल्क घेतलेले नाही.

Leave a Comment