भारतासह पाच देश बनविणार सर्वात मोठी दुर्बीण

telescope
टोकियो- जगातील सर्वात मोठी दुर्बीण टीएमटी भारत, अमेरिका, चीन, जपान व कॅनडा हे पाच देश मिळून बनविणार आहेत. ती हवाई द्विपावरील मौनाकिया ज्वालामुखी शिखरावर बसविली जाणार असून या दुर्बीणीच्या सहाय्याने ५०० किमीवरील छोटया नाण्याच्या आकाराची वस्तूही स्पष्टपणे पाहता येणार आहे. दुर्बीणीची लांबी ३० मीटर असून तिच्या उभारणीसाठी १.४ अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे.

जेथे ही दुर्बीण बसविली जाणार आहे तेथे ४०१२ मीटर उंचीवर एक समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला वरील पाच देशातील १०० खगोलशास्त्रज्ञ आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुर्बीण उभारणीचे काम २०२२ सालापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. येणार्‍या खर्चातील पाव हिस्सा खर्च जपान सरकार करणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठी दुर्बीण सुबारू याच शिखरावर तयार केली गेली होती. नव्याने उभारण्यात येत असलेली टीएमटी ही जपानच्या सुबारूपेक्षाही मोठी आहे.

Leave a Comment