इंडिगो ठरली सर्वाधिक नफा मिळवणारी हवाई वाहतूक कंपनी

indigo
मुंबई – मागील वित्तीय वर्षात सर्वाधिक नफा मिळवणारी नागरी उड्डयन कंपनी म्हणून इंडिगोने मान पटकाविला होता. आता इंडिगोने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी अधिकाधिक गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. चलनदरातील चढ-उतार आणि हवाई उड्डयन क्षेत्रातील किंमत युद्ध यांमुळे कंपनीला नफ्यातील चढाव-उतार सहन करावे लागत आहेत. ३१ मार्च २०१४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला निव्वळ नफा ३१७ कोटी रुपये इतका झाला होता. त्याआधीच्या वर्षी ७८७ कोटी नफा कमाविणार्‍या कंपनीच्या उत्पन्नात १८ टक्क्यांची वाढ झाली होती.

इंडिगोचे सीईओ आणि अध्यक्ष आदित्य घोष यांनी माहिती देताना सांगितले की, आर्थिक क्षेत्रातील मंदीची स्थिती असताना देखील कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. मागणीचा अभाव आणि किंमतीत नसणारे सातत्य यामुळे नफ्याच्या प्रमाणावर परिणाम झाला. इंडिगोची प्रतिस्पर्धी स्पाइसजेटला मात्र याच आर्थिक वर्षात १००३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गो एअरलाइन्सला याच आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या हवाई उड्डयन क्षेत्रातील अभ्यासानुसार, भारतातील विमान कंपन्यांचे दर जागतिक कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. जेट विमानाच्या इंधनाची आंतरराष्ट्रीय किंमत मोठी असल्याने प्रति ३.७० किलोमीटर अंतराला सरासरीच्या तुलनेत भारतीय हवाई उड्डयन कंपन्या स्वस्त दर आकारत आहेत. या आर्थिक वर्षात हवाई वाहतूक कंपन्यांनी १९.५७ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली जी गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्के जास्त होती. स्वस्त दर, चांगली सेवा आणि विश्वासार्हता या बळावर इंडिगोने आपल्या व्यवसायात आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुंतव

Leave a Comment