आर्थिक क्षेत्रातील इंग्रजीच्या वर्चस्वाला सेबीचा धक्का

sebi
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हिंदीला दर्जा दिल्यानंतर हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधण्यासाठी सेबीतर्फे (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) विशेष तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी सेबीने त्यांच्या विविध दस्ताऐवजांचा हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी व्यावसायिक मंडळ तयार करण्याची योजना आखली आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा धोरणानुसार ही पावले उचलली जात असल्याचे सेबीतर्फे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना सांगण्यात आले की, विविध दस्तांऐवजांचे इंग्रजीतून हिंदीत अनुवाद करण्यासाठी अनुवादकांची एक समिती बनविण्यात येणार आहे. सेबीच्या वेगवेगळ्या अधिकार्‍यांनी (विशेषतः हिंदी भाषिक) आपल्या आदेशात तसेच पत्रव्यवहारात राजभाषा हिंदीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. हिंदी आणि इंग्रजीच्या व्यावसायिक अनुवादकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या अनुवादकांना भांडवली बाजारातील शब्द आणि संकल्पना यांची माहिती असावी. तसेच या अनुवादकांनी ठराविक वेळेत व यथायोग्य अनुवाद पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment