अखेर मायकल फ्लेप्सवर ६ महिने खेळण्यास बंदी !

felphs
वॉशिंग्टन – १८ वेळा ऑलंपिक विजेता ठरलेला जलतरणपटू मायकल फ्लेप्सवर दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे अटक होण्याची वेळ आली आणि आता त्याच्यावर ६ महिने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे २०१५ च्या जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत तो भाग घेऊ शकणार नाही. ६ दिवसांपूर्वी फ्लेप्सला दारू पिऊन वेगाने गाडी चालविण्यात आणि बोगद्यातून वाहतूकीचे नियम तोडून गेल्यामुळे अटक करण्यात आली होती. स्थानिक मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार फ्लेप्सची अमली पदार्थ सेवन केल्याबाबतची चाचणी होऊ शकली नाही. मात्र, २९ वर्षीय या खेळाडूवर नशा करून गाडी चालविणे, वेगात गाडी चालविणे आणि डबल लेन लाइन ओलांडून जाणे असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. फ्लेप्सने देखील ट्विटरवरून या घटनेची जबाबदारी स्विकारली असून, त्याने जलतरणापासून दूर राहत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने म्हटले आहे की, या निर्णयामुळे जे निराश झाले असतील त्यांची मी माफी मागतो, फ्लेप्सच्या नावे १८ ऑलंपिक सुवर्ण पदके आहेत. २०१२ च्या लंडन ऑलंपिकनंतर त्याने जलतरणातून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी, यावर्षी त्याने पुन्हा जलतरण करण्यासाठी सराव सुरु केला होता आणि आता तो २०१५ च्या ऑलंपिकमध्ये भाग घेण्याची शक्यता होती. अमेरिकेच्या जलतरण महासंघाचे कार्यकारी प्रमुख चुक विल्गस यांनी त्याच्या शिक्षेची घोषणा केली आहे. जलतरण महासंघाच्या मान्यता असलेल्या स्पर्धांमध्ये ६ मार्च २०१५ पर्यंत त्याला आता खेळता येणार नाही. मात्र फ्लेप्सने २ ते ९ ऑगस्ट दरम्यान रशियातील कझान येथील जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment