वेस्टइंडिज विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला उद्यापासून सुरुवात

team-india
कोच्ची, ०७ ऑक्टोबर, (हिं.स.) : वेस्टइंडिज विरूद्ध बुधवारपासून सुरु होणा-या ५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ विश्वचषकापूर्वी निर्धारित षटकातील क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी उतरणार आहे. भारताने वेस्टइंडिजला २००६-०७ नंतर मागील पाच मालिकांमध्ये हरविले आहे, ज्यात तीन कैरेबियन खेळपट्टीवर खेळविण्यात आलेल्या तीन मालिका सामिल आहेत. भारत या मालिकेत देखील आपला विजयी रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी उतरणार आहे. भारतीय संघासाठी वेस्टइंडिजचे कडवे आव्हान नसेल. त्यांचा फिरकीपटू सुनील नारायण देखील न खेळल्याने कैरेबियन संघ जास्त कमजोर झाला आहे. नारायणला चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये अवैध गोलंदाजी ऍक्शनमुळे मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. तसेच कैरेबियन रन मशीन ख्रिस गेल देखील संघात सामिल नाही. पहिल्या सामन्यावर पावसाचा व्यत्यय असल्याच्या शंका असतानाही, क्रिकेटप्रेमी या सामन्याची वाट पहात आहेत.

यजमान संघ या मैदानावर १-० ची आघाडी मिळविण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. विराट कोहलीचा खराब फॉर्म ही संघाची एकमेव चिंता आहे. निवडकर्त्यांनी दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मुरली विजयला निवडले आहे. विराटसाठी आपला फॉर्म परतण्याची ही चांगली संधी आहे. सुरेश रैना, अंबाती रायडू आणि धोनी यांच्यामुळे संघाची मध्यमफळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत मोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ज्याने सुपरकिंग्ससाठी गडी बाद केले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि उमेश यादव भारतीय जलदगती गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. तर, फिरकीची दारोमदार अमित मिश्रा आणि रविंद्र जडेजावर असेल. संघातील नवा चेहरा असलेला फिरकीपटू १९ वर्षाच्या कुलदीप यादवला या सामन्यात संधी मिळते की नाही हे पहायचे आहे. दुसरीकडे वेस्टइंडिजला आपली सर्वश्रेष्ट कामगिरी करावी लागेल. ज्यांनी नुकतेच बांगलादेशला हरविले आहे. वेस्टइंडिजचे १५ पैकी ७ खेळाडू आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये खेळल्यामुळे त्यांना या मालिकेत नक्कीच फायदा होर्इल.

मागील नोव्हेंबर महिन्यात डेरेन सॅमीच्या जागी ड्वेन ब्रावोला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. ज्याचा पहिला अनुभव खूप खराब आहे. ड्वेन ब्रावो आणि किरोन पोलार्ड सारख्या फलंदाजांकडून कैरेबियन संघाला खूप अपेक्षा आहेत. गोलंदाजीत टेलरने ९८ गडी बाद केले आहेत. त्याच्या पुनरागमनाने गोलंदाजीचे आक्रमण मजबूत झाले आहे. केमार रोच आणि रवि रामपाल देखील संघात सामिल आहेत. फिरकीपटू नारायणच्या अनुपस्थितीत सुलेमान बेनवर दबाव आला आहे.

भारतीय संघ – महेंद्र सिंह धोनी, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहल, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.

वेस्टइंडिज संघ – ड्वेन ब्रावो (कर्णधार), डेरेन ब्रवो, जॉसन होल्डर, लियोन जॉनसन, कीरोन पोलार्ड, दिनेश रामदीन, रवि रामपाल, केमार रोच, आंद्रे रसेल, डेरेन सॅमी, मलरेन सॅम्युअल्स, लॅंडल सिमंस, ड्वेन स्मिथ, जेरोन टेलर.

Leave a Comment