सोयाबीनचे पीक वाळल्याने शेतकरी हवालदिल

soyabean
गडचिरोली – गेल्यावर्षी अतीवृष्टीने तर यावर्षी कमी पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झाल्याने, पुढच्या वर्षीच्या हंगामात पुन्हा सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. बियाण्यांची यावर्षीचे उगवणशक्तीचे प्रमाण बघता, पुढील वर्षीच्या हंगामात सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता असून पीक वाळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन पीक सध्या परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. सोयाबीनला यावेळीच पाण्याची नितांत गरज असते, परंतु यावर्षी पावसाचे आगमनच उशिरा झाले आणि बर्‍यांच दिवसांपासून त्याने दडी मारली आहे. त्यातच तापमान प्रचंड वाढल्याने सोयाबीनचे पीक करपले आहे. चालू खरीब हंगामात सतत संकटाच्या मालिकेचा सामना करणार्‍या जिल्ह्यातील शेतकरी आता या संकटापुढे हतबल झाले आहेत.विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने सर्वच खरीप पिकांची पेरणी उशिरा झाली. सोयाबीनची पेरणी तर ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबली. पेरणीला उशीर झाल्याने या पिकाचा काढणीचा हंगाम एक महिना पुढे गेला आहे. आता पावसाळा संपल्याने या पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. आणि पापशा मुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन करपायला सुरुवात झाली आहे. शेंगा भरल्या नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत असताना, आता पीक जळत असल्याचे पाहून शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Leave a Comment