शिवसैनिकांना स्वच्छ भारतची गांधीगिरी आठवते तेव्हा… !

shivsena
मुंबई – शिवसेनाप्रमुखांच्या आदरापोटी टिका टाळण्याचा प्रयत्न केला, असे सांगणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत घोषणेचे अनुकरण मुंबईतील शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केले आहे. शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर मोदींची सभा होऊन गेल्यानंतर तेथे जागोजागी पडलेला कचरा भल्या सकाळी शिवसैनिकांनी येऊन स्वच्छ केला आणि सैनिकांची ही गांधीगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे नगरसेवक अरुण दुधवडकर मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना मोदींच्या रॅलीनंतर जागोजागी पडलेला कचरा दिसला. त्यानी ताबडतोब शिवसैनिकांना गोळा करून हा कचरा हटवण्याचे काम सुरू केले. शिवसैनिक देखील तत्परतेने झाडू आणि बादल्या घेऊन पोचले. त्यांनी हा कचरा पाण्याच्या बाटल्या, झेंडे बॅनर गोळा करून परिसर स्वच्छ केला. २ ऑक्टोबरला पंतप्रधान स्वत: स्वच्छ भारत अभियानात उतरले होते. शिवसेनेचे नेते भाजपवर टिका करत असतांना सेनेचे कार्यकर्ते मात्र भाजपचा कार्यक्रम राबवतात आणि मोदींची सभा होऊन गेल्यानंतर. यावर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

Leave a Comment