रोनाल्डो आणि बेलच्या शानदार कामगिरीमुळे रियाल माद्रिद विजयी !

football1
माद्रिद – स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गारेथ बेलच्या शानदार कामगिरीच्या बळावर रियाल माद्रिदने स्पॅनिश प्रिमियर लीगच्या एका सामन्यात एथलेटिक क्लब बिल्बाओला ५-० ने हरविले. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ही सामन्यातील तिसरी हॅट्रिक आहे. या विजयानंतर रियाल माद्रिदने सत्रात पहिल्यांदा अव्वल चारमध्ये स्थान मिळविले आहे. मागील काही सामन्यात खराब कामगिरीमुळे बेलने रोनाल्डो आणि करीम बेंजेमाला तीन गोल करण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. रोनाल्डो आणि बेंजेमाने मिळून सामन्यात एकूण पाच गोल केले, ज्यात तीन गोल रोनाल्डोने केले. एका अन्य सामन्यात सेविलाने सत्रातील आपली शानदार सुरुवातीला कायम ठेवत डेपोर्टिवोला कोरूनाला ४-१ ने हरविले. दुसरीकडे विलाररियलने देखील सेल्टा विगोला ३-१ ने मात दिली. तर, एस्पानियोलने रियल सोसिडाडच्या खराब कामगिरीचा फायदा उचलत २-० ने विजय नोंदविला आणि गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहोचला. वेलेंसियाने देखील तिस-या स्थानावरील संघ एटलेटिका माद्रिदला ३-१ ने हरवून, अंकतालिकेत आपले दुसरे स्थान कायम ठेवले. तर, र्इबार आणि लेवांते यांच्यात सामना ३-३ ने बरोबरीत सोडविला.

Leave a Comment