महिंद्राची हायब्रीड एक्सयुव्ही ५०० पुढील वर्षात येणार

xuv
महिंद्राने त्यांची एक्सयव्ही ५०० तीन वर्षांपूर्वीच बाजारात आणली असली तरी आता याच मॉडेलची सुधारित आवृत्ती हायब्रीड एक्सयूव्ही ५०० पुढील वर्षात कंपनी बाजारात आणत असल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा म्हणाले,आम्ही ही नवी सुधारित हायब्रीड एक्सयूव्ही ५०० या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. नवीन मॉडेल १८ टक्के जास्त फ्यूएल इफिशियंट आहे.

कंपनी पुढील वर्षात ही कार बाजारात आणू शकेल असे सांगून ते म्हणाले की कंपनीची बाजारात उतरण्याची तयारी पूर्ण असल्याशिवाय आम्ही आमची मॉडेल प्रदर्शनात सादर करत नाही. आमचे तीन वर्षांपूर्वीच एक्सयुव्ही ५०० मॉडेल आजही लोकप्रिय असून त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच आता ग्राहकांना नवीन कांही देण्याचा आमचा विचार आहे.

Leave a Comment