पीटरसनने केली इंग्लंड क्रिकेट संघावर टिका

piterson
लंडन – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने इंग्लंड क्रिकेट संघातील वातावरणाला नकारात्मक असल्याचे म्हटले आहे. त्याने मैट प्रायरला ‘ड्रेसिंग रूममधील वातावरण खराब करणारा’ आणि माजी प्रशिक्षक एंडी फ्लॉवरला ‘घाबरत-घाबरत निर्णय घेणारे’ अशा बोच-या शब्दात त्यांच्यावर टिका केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून करार संपविण्यात आल्यानंतर पहिल्यांदा पीटरसनने आपले मत सांगितले आहे. डेली टेलीग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना पीटरसनने सांगितले की, माझी काही चूक नसताना मला संघातून बाहेर करण्यात आले. गुरुवारी पीटरसनचे नवे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यापूर्वी त्याने अशा प्रकारची इंग्लंड संघावर टिका केली आहे. ३४ वर्षाच्या पीटरसनने १०४ कसोटी सामन्यात ४७ च्या सरासरीने ८१८१ धावा केल्या. त्याने तीन कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व देखील केले. दक्षिण आफ्रिकेच्या केविन पीटरसनची क्रिकेट कारकीर्द यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाकडून एशेसमध्ये इंग्लंडचा ०-५ ने पराभव झाल्यानंतर इंग्लंड आणि वेल्ड क्रिकेट बोर्डाने त्याचा करार संपविला होता. पीटरसनने माजी प्रशिक्षक फ्लॉवर आणि काही वरिष्ट खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये ‘बुलीइंग कल्चरला’ हवा देण्याचा आरोप केला आहे. त्याने सांगितले की, मैदानात क्षेत्ररक्षणा दरम्यान, झेल सोडल्यावर किंवा कमजोर क्षेत्ररक्षण झाल्यावर खेळाडूंना माफी मागण्यासाठी मजबूर केले जात होते, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment