नवी मुंबईत नवीन वाहने नोंदणीचे प्रमाण घटले

cars
नवी मुंबई – गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात नवी मुंबईच्या परिवहन कार्यालयातून होणार्‍या वाहन नोंदणीमध्ये घट झाली आहे. परिवहन विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात केवळ एक हजार ८२७ कारमालकांनी वाहन नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी याच काळात चार हजार १६३ वाहनांची नोंद झाली होती. पाच ते दहा लाख रुपये किंमतीच्या या कार आहेत. वाशी परिवहन कार्यालयात दहा ते २० लाख दरम्यानच्या ४०९ कारची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात तेथे ७८४ याच प्रकारातील वाहने नोंदणीकृत झाली होती. सन २०१३ च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात ५० टक्क्यांपेक्षा कमी वाहनांची नोंदणी नवी मुंबई परिवहन परिसरात झाली आहे. ४० ते ५० लाख अशा महागड्या वर्गातील कारच्या नोंदणीत देखील गतवर्षीच्या तुलनेत ७१ टक्क्यांची घट झाली आहे. तर ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत किंमतीची वाहने नोंदविण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. वाशी येथील परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले की, एलबीटीच्या कारणाने ही नोंदणी कमी होण्याची शक्यता नाही. मात्र,दिवाळीच्या आणि दसर्‍याच्या सुमारास ज्या मोठ्या प्रमाणात वाहननोंदणी होते तेवढी यावर्षी होताना दिसत नाही. पनवेल परिसरात मात्र नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. तेथील कार नोंदणीच्या टक्क्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

Leave a Comment