ताडोबातील बुकिंगवर पर्यटकांच्या उड्या

tadoba
नागपूर – विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांच्या हमखास दर्शनासाठी नावारुपास आल्याने पर्यटकांचा ओघ वाढला. पावसाळ्यामुळे तब्बल तीन महिने बंद असलेला ताडोबा १६ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला होत असताना मोहर्ली, कोलारा, फुंटवंडा आणि नवेगाव प्रवेशद्वारावरील बुकिंग जोमाने सुरु आहे. दिवाळी सुट्टीतील या प्रवेशद्वारावरील बुकिंग आताच हाऊसफुल्ल होत आहे.जगभरात वाघांची घटणारी संख्या ही चिंतेचा विषय झाला आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे वाघांची संख्या वाढताना दिसत आहे.ताडोबा राज्यातील वाघाचे मोठे आश्रयस्थान आहे. पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा ही पहिले पसंतीचे केंद्र असल्याने देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही येथे येतात. कारण या व्याघ्रप्रकल्पात वाघासोबतच इतर वन्यप्राणी पर्यटकांना हमखास होते. यामुळेच पर्यटकांचा ओढा वाढत असल्याने व्याघप्रकल्प उघडण्यापूर्वीच हाऊसफुल्ल होऊ लागले आहे. वनविभागाच्या ऑनलाईन बुकिंगवर पर्यटकांचा उड्या पडत आहे.

Leave a Comment