जपानमध्ये फानफोन चक्रीवादळामुळे ५० हजार लोक प्रभावित

fanfon
टोकियो – जपानमध्ये चक्रीवादळफानफोनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे शेकडो विमाने रद्द करण्यात आली आहेत. लोकांना सुरक्षित स्थानीवर जाण्यास सांगितले आहे. या चक्रीवादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फानफोन चक्रीवादळ रविवारी जपानच्या जवळ आल्यावर ओकिनावा बेटावर जोरदार लाटा उसळू लागल्या, यामध्ये अमेरिकेतील ३ नागरिक वाहून गेले. त्यातील १ नागरिकाचा मृतदेह मिळाला असून २ नागरिकांचा शोध लागलेला नाही. या चक्रीवादळामुळे होंडाने हामामात्सू आणि सूतुका शहरातील औद्योगिक शाखेतील काम बंद करण्यात आले आहे. निसान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ओघपाला संयंत्रामधील काम बंद करणार आहे. संपूर्ण पूर्व जपानमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्यची शक्यता आहे. ५० हजार पेक्षा अधिक लोकांनी या ठिकाणाना सोडून सुरक्षितस्थानी जाण्यास सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वा-यामुळे शेकडो विमानाना रद्द करण्यात आले आहे. टोकियोमधील पश्चिममध्ये शिनकानसेन बुलेट रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. जपान एयरलाइंसने सांगितले की, ६०० स्थानिक उड्डान आणि १० आतंरराष्ट्रीय उड्डानाना रद्द करण्यात आले आहे. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे १२९ किलोमीटक प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. तसेच त्यांची गती १८५ किलोमीटर प्रति तास आहे. फानफोन ४५ किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर ते पूर्वेच्या दिशेने पुढे सरकत आहे. मुसळधार पावसामुळे ओन्ताके पर्वतामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेपत्ता असलेल्या १२ लोकांचा शोध घेण्याचे काम बंद करण्यात आले आहे.

Leave a Comment