कीफ, एडवर्ड मोजर, मे-ब्रिट यांना संयुक्त स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार

nobel
स्टॉकहोम – वैद्यकीयक्षेत्रात एडवर्ड मोजर, त्यांनी पत्नी मे-ब्रिट मोजर आणि जॉन कीफ यांना संयुक्त स्वरूपात २०१४ सालाचा नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात नोबेल पुरस्कार विजेता असणा-या या तीनशास्त्रज्ञांनीमेंदूच्या गणनाशक्तीवर काम केले होते. त्यासाठी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वैद्यकीयक्षेत्रामध्ये २०१४ सालाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावांची घोषणा स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये नोबेल समितीने केली. नोबेल विजेत्या एडवर्ड मोजर यांचा १९६२ मध्ये नॉर्वेमध्ये जन्म झाला होता. त्यांची पत्नी मे-ब्रिट मोजर यांचा १९६३ साली नोर्वेमध्येच जन्म झाला. तसेच जॉन कीफ यांचा जन्म १९३९ साली अमेरिकेमध्ये झाला होता. १९०१ साली वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार सुरू झाल्यानंतर सुमारे १० महिला या पुरस्काराच्या विजेत्या झाल्या आहेत. मे-ब्रिट मोजर हा पुरस्कार प्राप्त ११व्या महिला आहेत. पुरस्काराच्या स्वरूपात मिळणा-या रक्कमेचा अर्धा हिस्सा जॉन कीफ यांना देण्यात येणार आहे. शिल्लक रक्कम मोजर दांपत्याला देण्यात येणार आहे.

Leave a Comment