ईद-उल-झुआच्या निमित्त मुस्लिम बांधवांनी दिली पवित्र कुर्बानी

eid
पुणे – बकरी ईदच्या कुर्बानीसाठी पुणे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी जय्यत तयारी केली होती. गुरुवार पेठ येथील मौलाना काझमी यांनी सोमवारी भल्या सकाळी प्रेक्षीत इब्राहिम आणि त्यांचा पुत्र इस्माईल यांच्या कुर्बानीसाठी प्रार्थना केली आणि ईद-उल-झुआ साजरी केली. मौलाना काझमी म्हणाले की, परंपरेनुसार आम्ही काही दिवस अगोदर बकरा खरेदी करतो आणि त्याची काळजी घेतो. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करून अल्लासमोर त्याची कुर्बानी देतो. हल्लीच्या काळात यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची प्रथा रुढ झाली असून ते प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. असे असले तरी, अल्लाला केवळ कुर्बानी पोहोचते, रक्त किंवा मांस नव्हे असे ते म्हणाले. पवित्र कुराण शरीफमध्ये सांगितल्यानुसार, प्रेक्षित इब्राहिम यांनी स्वच्छेने आपली आणि आपल्या मुलाची कुर्बानी दिली होती आणि आजही मुस्लिम बांधव त्यांची आठवण ठेवतात असेही ते म्हणाले. त्यांच्या या कुर्बानीने प्रसन्न होऊन अल्लाने एका मेंढ्याच्या रुपात त्याचा मुलगा परत केला आणि कुर्बानीमधील मांस कुटुंबीय, नातेवाईक आणि गरिबांमध्ये वाटले, अशी पारंपारिक प्रथा आहे असे त्यांनी सांगितले. ऑल इंडिया कौमी तैझीमचे अध्यक्ष हाजी झकीर शेख यांनी सांगितले की, कुर्बानीमधील मांस मित्र-परिवारात वाटले जाते. तसेच ते कुटुंबीय आणि गरजूंना दिले जाते. त्यामुळे हे मानवतेपेक्षाही मोलाचे काम आहे, असे आम्ही मानतो. प्राध्यापक अन्वर शेख यांनी सांगितले की, सध्याच्या काळात प्रथा आणि परंपरा यांच्या पलीकडे जाऊन आम्ही हिंदू मित्र परिवाराला देखील या सणात सहभागी करून घेतो. गरीब मुस्लिम समाजासाठी ईद-उल-झुआचा सण विशेष महत्वाचा आहे. कारण वर्षातून एकदा तरी त्यांना मनाप्रमाणे मटण खाता येते. गरीब आणि अनाथ मुलांना या दिवशी मनसोक्त जेवता येते. त्यासाठी अनेक श्रीमंत मुस्लिम देशातून मांस पाठविले जाते, असे सैफ अहमद यांनी सांगितले.

Leave a Comment