अमेरिकेच्य़ा ड्रोन हल्ल्यात पाच नागरिक ठार

drone
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील अशांत अशा आदिवासी बहूल क्षेत्रात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्य़ात पाच नागरिक दगावले असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण वजरीस्तान परिसरातील एका घरावर दोन क्षेपणास्त्रे अमेरिकेतर्फे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच नागरिक दगावले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या घराला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, तेदेखील पूर्णतः उध्वस्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पाकिस्तानने अमेरिकेच्या या कारवाईचा विरोध केला आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे हे उल्लंघन असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Leave a Comment