अजमल गोलंदाजीची ऍक्शन सुधारण्याचा प्रयत्न करतोय – पीसीबी अध्यक्ष

pcb
कराची – पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले की, निलंबित फिरकीपटू सर्इद अजमल आपल्या गोलंदाजीची ऍक्शन सुधारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र, विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात त्याला स्थान मिळविणे कठिण आहे. त्यांनी सांगितले की, मी येथे येण्यापूर्वी अजमलसोबत बातचीत केली. तो खूप मेहनत करतो आहे. त्याच्यासोबत सकलेनच्या नेतृत्वात विशेषज्ञ काम करत आहेत. मात्र, त्याने स्वत: मान्य केले की, त्याला माहित नाही की, चूक कुठे झाली? मात्र, तो चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यांनी सांगितले की, मला सांगण्यात आले की, तो आपल्या मनगटाला लवचिक बनविण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, अद्यापही त्याचे मनगट १५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त फिरत आहे. अजमलला विश्वास आहे की तो आपली चूक नक्की सुधारेल. मात्र, हे आव्हानात्मक आहे. केवळ त्याच्या गोलंदाजीवर नव्हे तर, त्याच्या संपूर्ण ऍक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आणि त्याला ते बदलावे लागेल. जर मला विचारले की, त्याच्या खेळण्याची किती शक्यता आहे? तर मी त्याचे उत्तर ५०-५० टक्के देर्इल, असेही ते पुढे म्हणाले. शहरयार पुढे म्हणाले की, आपला ‘अ’ आणि ज्यूनियर संघ पाकिस्तानला पाठविण्यासाठी ते क्रिकेट बोर्डाला समजाविण्यात यशस्वी होतील. दुबर्इत तीन – चारवेळा आयसीसी प्रमुख एन. श्रीनिवासन यांना भेटील. भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तानात खेळणे यात समस्या नाहीत. मात्र, भारताचा वरिष्ट संघ पाकिस्तान दौ-यात सुरक्षा कारणांमुळे येणे शक्य देखील नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment